” भूकंपाचे धक्के ओबीसींनाच ”
___माजी खासदार हरिभाऊ राठोड.. ______
—– राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री , मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वारंवार सांगत होते की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, परंतु ५४ लाख नोंदी सापडल्याचे जरांगे पाटील सांगत आहेत आणि दोन दिवसात नोंदी सापडलेल्या व्यक्तींना कुणबी असल्याचे दाखले देण्याकरिता सरकारवर प्रचंड दबाव आणत आहे आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव टाकत आहेत.
याचाच स्पष्ट अर्थ असा होतो की मराठा समाजातील हे सर्व बांधव कुणबी म्हणून ओबीसीच्या १९%आरक्षणाला भूकंपा सारखे धक्के देणार ,, अर्थात ओबीसी मधील कमजोर जाती आणि बारा बलुतेदार यांच्या आरक्षणावर हे डल्ला मारणार आणि ओबीसींवर अन्याय करणार.
माझी विनंती आहे मंत्री छगन भुजबळ यांना की ,त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा सरकार मध्ये राहून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी वक्तव्य करू नये, यातून भुजबळ यांची दुटप्पी भूमिका लोकांसमोर उघड होत आहे, असा टोला माजी खासदार आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी लगावला.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा एकमेव पर्याय म्हणजे बांटिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून , न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन हाच एकमेव पर्याय असल्याचे मत देखील राठोड यांनी मांडले.